Home » » आयुष्य

आयुष्य

Written By Nirbhaya on Tuesday, March 10, 2020 | March 10, 2020

 आयुष्यआयुष्य

आयुष्य  सुःख आणि दुखाने भरलेल, कधी रडत तर कधी हसत.
कधी मोठ मोठ्या राजकारणात गुंतलेल तर कधी जातिवादाने   पेटलेल.
कधी खुन तर कधी मारामाऱया  ,कधी त्या निष्पाप जीवावर बलत्कारी प्रकरण करणार.
आयुष्य हे जगत असताना खुप काही शिकवणारं आणि मेल्यावर आत्मा होऊन बघनार...

कावळा, कुत्रा,पाण्यातला मासा म्हणा किंवा माणुस म्हणा कोणताही प्राणी कसाना कसा या विश्वात जगत असतो.
आपल्या जीवनावर खुश नाहीतर नाखुश तरी असतो ,कधीतरी आपला अंत येणार या अविर्भावत जगत असतो.

कोणी माणसांमधे संत होऊन तर कोणी भक्त होऊन देवाच्या भक्तीत आपलं आयुष्य जगत असत.
तर कोणी महान कार्य करुन लोकांना जगण्याचे धड़े देत असत ,कुठे ना कुठे कस ना कस हे जग चालत असत.
 कऱोडोंच्या संख्येने वसलेल्या वसाहातीत स्वताच घर शोधत असत ,आपल अस घर बनवत असत...

धावत्या जीवनाच्या ओघात एकमेकांशी संघर्ष करत कोणी पुढे जात  असत तर कोणी मागे राहत असत.
पुढे जाऊन समाज घडवत असत तर कोणी स्वताचा स्वाभिमान जपत असत...
स्वताच्या सुखासाठी कोणी दुसऱ्याच्या पोटवर लाथ मारत तर कोणी स्वताच्या भल्यापेशा दुसऱ्याच्या सुखाची चाचणी देत असत ,असना तस जग स्वताला जगवत असत...

मोठ्याश्या या भूगोलवार छोट्याश्या जीवाणूंच जीवन चालत असत आणि  त्यातच स्वताच सुख शोधत असत. मुक्या जनावरांचा बळी देऊन कोणी स्वताच पोट भरत असत तर कधी क्रूर स्वभावने स्वताच स्वताच्या मरण्याच कारण  बनत असत...

अस हे जीवन प्रत्येक जन जगत असत,
अस हे जीवन प्रत्येक जन जगत असत... 


                                                                                    -योगीनी उत्तम मोंडकर 

 

Popular Posts

Followers