देवगड एक पर्यटन
![]() |
| देवगड एक पर्यटन |
नमस्कार फ्रेंड्स ,निसर्गाच्या सनिध्यात फिरायला, मौज-मजा करायला आवडत का?आवडत असेल तर हा ब्लॉग नक्की वाचाच. कारण विषयच असा आहे,फिरायला जायचं असेल तेव्हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो,कुठे जावे फिरायला? तर हाच विषय मांडता ना,मला कोंकण चा निसर्गरम्य परिसर आठवला.कोंकण म्हणजे निसर्गाने तयार केलेला स्वर्गच .हिरव्यागार झाडाझुडपांनी बहरलेला,ताजी मोकळी हवा वेगळाच मनमोहून टाकणारा कोकणचा निसर्ग.तर कोकणातल्या सिंधुदुर्गतला देवगड तालुका एक पर्यटनचे विशेष स्थळ बनला आहे.देवगड तालुक्यातल्या विलोभनीय स्थळांची माहिती तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण वाचून समजेल.
तुम्हाला जर देवगडला यायचे असेल तर तुम्ही कसा प्रवास कराल? हे आधी जाऊन घेऊ.मुंबई वरून बऱ्याच ट्रॅव्हलर्स कोकणात येतात.८ ते १० तासांचा हा प्रवास होईल.हल्ली online किंवा offline बुकिंग करणे हि शक्य झाले आहे.ट्रॅव्हल्स व्यतिरिक्त ट्रेन ची सुविधाही आहे.मुंबई ते कणकवली रेल्वे स्टेशन पर्यंत आल्यावर रिक्षा पकडून कणकवली बस डेपो मधून देवगड गाडी पकडावी लागते.कणकवली ते देवगड हा दीड तासांचा प्रवास करून तुम्ही देवगड मध्ये प्रवेश कराल.
पर्यटकांना राहण्यासाठी देवगड मध्ये अनेक सोयी सुविधा देखील उपलब्ध आहेत.देवगड सरकारी होम स्टे तसेच खाजगी रेसिडेन्स सुद्धा काही अंतरावरच आहेत.१००० - १५०० रुपयात तुम्ही येथे राहू शकता. जेवणाच्या उत्तम सोयी देखील देवगड मध्ये आहेत.अनेक नामवंत हॉटेल्स मध्ये तुम्ही मालवणी जेवणाचा आस्वाद नक्की घेऊ शकता.हा झाला सगळा येण्या जाण्याचा,राहण्याचा भाग.आता देवगड मधील पर्यटन स्थळे कोणती आहेत?ह्या वर आता आपण बोलू.
| देवगड एक पर्यटन |
बीच वर मनसोक्त फिरायला जवळ जवळ सगळ्यांनाच आवडत असावे.देवगड तालुक्यात तर आपल्याला असे बरेच बीच पहायला भेटतात .देवगड मध्ये उतरल्या उतरल्या जवळच देवगड चा बीच आहे.त्याच बीच ला लागून देवगड पवनचक्की देखील आहे.मुलांसाठी खेळायला बीचवरच गार्डन ची सोय देखील आहे.सूर्यास्त पाहायला ह्याच्यापेक्षा उत्तम view समुद्राच्या ठिकाणी कुठे मिळणार मिळेल असे वाटत नाही. विलक्षण असा नजारा ह्या बीच वर पाहायला मिळतो.बीच च्या परिसरात खूप आनंद दाई आणि शांत वातावरण देखील असत.एखाद्या कवीने जणू किनाऱ्या काठी बसून कविता करावी असा बीच चा परिसर आहे.असेच आणखी काही बीच तुम्हाला पाहायला मिळतील.विजयदुर्ग ,फणसे ,पडवणे,तारामुंबरी,मिठमुंबरी,कुणकेश्वर,मिठबाव ह्या बीच वर देखील तितकंच रम्य वातावरण आहे.
| देवगड एक पर्यटन |
देवगड तालुक्यात प्रामुख्याने मासेमारी आणि शेती केली जाते . देवगड बंदरावर छोट्या-मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय केला जातो. अनेक मोठं मोठे बाहेरील तालुक्यातील,जिल्ह्यातील व्यापारी मासे खरेदी करण्यासाठी येथे येतात.अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या माश्यांचा येथे मोठ्या प्रमाणात लिलाव केला जातो.वर्षातल्या ८ ते ९ महिने मासेमारी सातत्याने चालू असते.नारळीपौर्णिमा झाली कि मच्छीमार बांधवांचा हा प्रवास चालू होतो तो पावसाळा येई पर्यंत जोमाने चालू असतो.बऱ्याच कुटुंबांचं उदर्निवाह ह्याच व्यवसायाने होतो.शेती व्यवसायही तितकाच अनमोल ठरतो.
| देवगड एक पर्यटन |
कोकणात सण-उत्सव मोठ्या मनाने साजरे केले जातात. देवगड तालुक्यात सप्ताह ,शिमगा ,गणेश उत्सव मोठ्या भक्तिने साजरा केला जातो. बाहेर गावी असलेले चाकरमानी आपापल्या गावात परतून भक्तिभावाने प्रत्येक पारंपरिक कार्ये आटोपून जातात.गाऱ्हाणे घालत, देवाकडे "चुकले माकले असेल तर क्षमा याचना करून सुखसमृद्धी दे, देवा महाराजा ,होय महाराजा" असा घोष करतात .
![]() |
| देवगड एक पर्यटन |
Alphonso हापूस आंब्याने तर देवगड तालुक्याची शान वाढवली आहे. प्रत्येकाच्या जिभेवर भुरळ पाडून देशात -परदेशात सात समुद्रापार जाऊन एक वेगळीच ओळख ह्या हापूस आंब्याने देवगडला दिली .देवगड मधला हा हापूस आंबा दरवर्षी बाहेरच्या देशात निर्यात केला जातोय.अनेक आंबा उत्पादक ह्या व्यवसायामुळे प्रसिद्ध उत्पादक करते ठरले .
विजयदुर्ग आणि देवगड असे दोन ऐतिहासिक किल्ले देवगड तालुक्याला लाभलेत.देवगड वरून ३०किमी अंतरावर विजयदुर्ग किल्ला आहे.ह्या किल्ल्याची रचना ,आरमारी गोदी ,समुद्रांतर्गत तटबंदी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व सांगतात.ह्या किल्ल्याच्या सुमारे दीडशे सागरी मैल अंतरावर समुद्राखाली जाडजूड भिंत उभारली गेली आहे . छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यावर किल्ल्याच्या सभोवती चिखली तटबंदी उभारली.किल्ल्याचे क्षेत्रफळ जवळ जवळ १७ एकर १९ गुंठे झाले.किल्ल्याची सुरुवात गोमुख दरवाजापासून होते. मारुती मंदिर ,तोफा ,भुयारे अश्या अनेक ऐतिहासिक गोष्टी तुम्हाला ह्या किल्यात आल्यावर पाहायला मिळतील .
| देवगड एक पर्यटन |
देवगड किल्ला देवगड डेपोपासून जवळपास २-३ किमी अंतरावरच आहे. किल्ल्यावरून समुद्र न्याहाळायचा ,सूर्यास्त पाहायचा एक वेगळाच अनुभव आहे. किल्ल्यावर गणपती मंदिर,लोक वस्ती दिसून येतॆ. किल्यावर असलेले लाईट हाऊस ,त्या लाईट हाऊस वरून समुद्र इतका मनमोहक,सुंदर दिसतो कि तिथेच थांबून पाहत राहावे. ह्या लाईट हाऊस मुळे बोटींना,जहाजांना बंदरात येण्या जाण्याचा मार्ग समजतो .
| देवगड एक पर्यटन |
देवगड तालुक्यात ऐकून ९८गावे आहेत.प्रत्येक गावांमध्ये छोटीमोठी मंदिरे आहेत. त्यातील काही मंदिरे ऐतिहासिक आहेत. प्रत्येक मंदिराची एक वेगळी कथा आहे. कुणकेश्वर हे महादेवाचे मंदिर समुद्राकाठी वसले आहे. महाशिवयात्रीला मोठ्या प्रमाणात येथे जत्रा भरते .विमलेश्वर हे पांडव कालीन मंदिर आहे. दिर्बादेवी ,रामेश्वर ,पोखरबाव गणपती ,भगवती देवी ,रहाटेश्वर अशी प्रसन्नदायी मंदिरे आहेत.
| देवगड एक पर्यटन |
तसेच वॅक्स म्युसिअम मध्ये नेत्यांचे ,कलाकारांचे हुबेहूब असे पुतळे देखील पाहायला मिळतील. कंटेनर थिएटर चे एक विशेषही येथेच आपल्याला पाहायला मिळते. अश्या वेगवेगळ्या स्थळांचा सुंदर ठेवा देवगड तालुक्याला लाभला आहे .
तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते खाली नक्की लिहून पाठवा . फोटोस शेअर केल्याबद्दल माझ्या भावंडांचे विशेष आभार .
योगिनी उत्तम मोंडकर


2 Comments:
Excellent
Very beautiful..
Post a Comment