बाबा
आईचा धनी , तिचं सर्वस्व त्या नात्याचं नाव 'बाबा' ...
लहानपणात हाताचे बोट धरून चालायला शिकवणारे,
मुलांवर जिवापाड प्रेम करणारे ,
थकून आल्यावरही कुटूंबासोबात वेळ देणारे
आजारी पडल्यावर काळजीपोटी उशाशी बसणारे,
आपली मुले खूप मोठी व्हावीत म्हणून स्वतः झटणारे,
आपल्या मुलांनी खूप मोठे नाव कमवावे अशी अपेक्षा बाळगणारे,
वाईट वागल्यावर खूप ओरडणारे,
चूक झाल्यावर ती पोटात घालून समजावून देणारे,
चांगले काम केल्यावर खूप कौतुक करणारे,
परीक्षेत कमी गुण मिळाल्यावर न रागावता त्यातून मार्ग दाखवून देणारे ,
सर्वांवर प्रेम करणारे व सर्वांना समजून घेणारे,
प्रत्येक वेळी पाठीशी खंबीरपणे उभे असनारे ,
स्वतःला एक घास कमी खाऊन आपल्या मुलांना ,परिवाराला जपणारे
स्वतः फटाके चप्पल घालून दिवस घालवणारे ,
बालपणापासून आता पर्यंतच्या प्रवासात खस्ता खाऊन ,ताठ मानेणे समाजात उभे राहिलेले ,
समाजात स्वतःच्या कुटुंबाला जपून ठेवणारे ,
कुटुंबाची सतत काळजी करणारे ,
कुटुंबाच्या सुखात स्वतःचे सुखं मानणारे ,
घराचा पाया असलेले ,
माझ्या मनाचे हे मोठे व्यक्ती महत्व म्हणजे माझे जन्मदाते माझे "बाबा" ....
-योगिनी उत्तम मोंडकर

0 Comments:
Post a Comment