जन्मास आले मी घेऊनी सुख:दुखाचा प्रवास,
ह्यात रमले, हात जोडुनि,श्रद्धेचा तो श्वास,
मनात देव,शब्दात देव,स्त्रीत्वहे ध्यानात ठेव,
मासिक धर्म,नाही प्रकोप,कोणी समजावेल,हे खरं ,
नको अन्याय,सहन करतेय,मनाविरुद्ध काळोखात राहतेय,
छोटा तो जिव,समजेल का?,देवाची माणसे,असे करतात का !!
कोणाचा दोष,कोणी सांगेल ठोस??
३ दिवसाचे शाषण,का ?? स्त्री तूच ह्याच उत्तर शोध !!
का ? कशाला अस ? परंपरेच्या नावा खाली हा अन्याय का ? मी एक मुलगी आहे जिला असे प्रश्न सतत सतावतात. एका स्त्रीच्या आयुष्यात मासिक धर्म ही महत्वपूर्ण आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपण ह्या सृष्टीचा निर्माता म्हणून देवाला म्हणतो,जर त्याने हि सृष्टी तैयार केली तर स्त्रियांचा विचार हा त्याने जरूर केला असणार आणि मासिक धर्म ही बदलती शारीरिक प्रक्रिया तैयार केली.विज्ञानानुसार हे आपल्याला अधिक माहित आहे.परंतु काही जुन्या चालीरीती ह्या आधुनिक काळात खूप जास्त प्रमाणात जडलेल्या दिसतात. स्पष्ट बोलायचं झालाच तर मासिक धर्माच्या दिवसात होणारे कौटूंबिक किंवा समाजाचं एका स्त्रीवर होणारं शाषण !
वैदिक काळात विज्ञानाची भाषा समाजाला समजत न्हवती,म्हणून त्याकाळात एक प्रथा सुरु केली,कि स्त्रीने मासिक धर्मात कौटूंबिक कारभार पासून दार जाऊन वेगळा राहावं. परंतु त्या वेळीच राहणीमान आणि विज्ञानाचा ना झालेला विकास हि मूळ कारण होती. होय ह्या कालावधीत स्त्रीही मानाने व शरीराने थकते,पण तिचा मान हा तेवढाच असतो,ती तिच स्त्री असते ,जी आपली आई,बहीण,बायको किंवा मुलगी असते.
आजच्या काळातही ह्या कणखर आणि क्रूर परंपरेच्या नावाखाली अन्याय केला जातो, काही लोक त्या स्त्री ला खूप वेगळ्या पद्धतीने वागवतात. तिला जेवण घरात ना घेणं, बाहेर वडीलधार्या समोर ना येणं, एका वेगळ्या खोलीतच बंद राहणं किंवा बाहेर राहणं, वेगळी भांडी, सुख कार्यात सहभागी ना होणं, देवाची पूजा न करण. अशा व ह्या पेक्षा घातक परंपरा अजून समाजात चालू आहेत.ह्याचा संपूर्ण त्रास हा स्त्री वर्गावर होताना आपल्याला पाहायला मिळतो.काही मुलींना ह्या मासिक धर्माचा राग किंवा हे का होत आपल्यालाच?? अशे प्रश्न निर्माण होऊन त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो आणि अनेक आजारांना ते बळी पडतात. हा अन्याय न्हवे तर काय आहे?
आजच्या दशकात मुलगी अंतराळात पोहोचली,तिथेही ती एका शुभकार्यासाठीच गेली,तेव्हा ह्या परंपरे विरुद्ध विज्ञान जिंकल, अनेक कार्यात मुली पुढे येतायत मग ह्या रूढी अजून का ? माझा परंपरेला विरोध नाही पण आता तो काळ नाही आता माणसाचा सर्वांगीण विकास झालेला आहे. परंपरा तिची वाटचाल ठेवावी पण चुकीच्या रूढी ह्या माझ्या समाज तुन निघाव्यात आणि आपली वाटचाल प्रबोधना कडे न्यावी हाच उद्धेश्य मनात ठेवला, तर समाज अंधश्रद्धेतून बाहेर पडेल आणि नवीन झेप घेईल.
समाजात बदल हा एक माणूस करू शकतो,कोणाला परंपरेची किंवा देवाची भीती दाखवूं अन्याय करणं ह्याला अंधश्रद्धा म्हणतात, ह्याचा ह्या समजातून नायनाट होणं काळाची गरज आहे. चला तर एक पाऊल पुढे टाकून आपल्याच घरातून ह्याची सुरुवात करूयात,आणि एक नवीन आणि आधूनिक विचारसरणी निर्माण करू,जी प्रत्येक व्यक्तीला,माणूस म्हणून जन्माला आलोय ह्याचा आनंद देईल, ऊर्जा देईल.
- योगिनी उत्तम मोंडकर.

8 Comments:
मस्त,योगिनी तुज़्या मुळे,आशा अंधश्रद्धेत जखडलेल्या लोकांचे नक्कीच डोळे उघडतील.Proud of you!!
Proud of uh girl....
👍👍👏👏
Nice thought yoginee...good one 👌👌..you are really good writer...
Nice one dea...👌👍
Keep it up 👍👍
Nice thought yoginee
proud of you sista
nice thought��
Post a Comment