captcha in Marathi|कॅप्चा चा अर्थ काय?| कॅप्चा कोड म्हणजे काय?
तुम्हाला कधी वेबसाइट ओपन करून फॉर्म भरायचा असला तर नेहमी captcha भरावा लागतो. त्याशिवाय तुमचा फॉर्म submit केला जात नाही . तुम्हाला पण असा विचार आला असेल ना सारखं सारखं captcha का भरायचा? का असे captcha आपल्याला दाखवले जातात ? का आपला वेळ captcha भरायला घेतला जातो?
आपण बऱ्याचदा ऑनलाईन तिकिट बुकिंग करतो. जर समजा आपण एखाद्या वेबसाईटला तिकीट बुक करत असताना, दुसऱ्या एखाद्या ठिकाणी एखादी व्यक्ती तिकीट बुक करत असेल आणि आपल्याला तिकिट बुक करायला वेळ लागत असेल (नेटवर्क कमी असल्याने किंवा काही काम आलं मधेच ) तर त्या दुसऱ्या व्यक्तीला ते तिकिट मिळून जात. पण एखादा प्रोग्रामर असेल त्याने कोडींग व्दारे , वेळ सेट करून ऑटोमॅटिकली किती ही वेळा तो तिकीट फॉर्म भरू शकतो. त्यामुळे ज्यांना खरोखरच तिकिट फॉर्म भरायचे आहे, त्यांना मात्र वेळेत तिकिट भरता येत नाही. ह्या अश्या कोडींग मुळे त्या वेबसाईटला हानी पोहचते. एकावेळी लाख -लाख रेजिस्ट्रेशन करून G-MAIL Id तयार करता येतात. ह्या सगळ्याला आळा घालण्यासाठी म्हणजेच हे फॉर्म नक्की माणूस भरतोय का रोबोट(कोडिंग)भरतोय हे समजण्यासाठी captcha चा शोध लावण्यात आला.
CAPTCHA चा फुलफॉर्म आहे Completely Automated Public Turning Test To Tell Computers And Humans Apart. २००३ मध्ये captcha design केला गेला. त्यात अशी काही अक्षरे असत, जी अक्षरे फक्त माणूस डोळ्यांनी पाहून captcha भरू शकतो. हे काम कोणत्याही रोबोट (कोडिंग) द्वारे भरता येणार नाही. हे शब्द कसे अश्या प्रकारे ठेवले गेले की कॉम्पुटरवर बऱ्याच प्रकारची पुस्तके स्कॅन केली गेलीत त्यामधून कॉम्पुटर ला जी अक्षरे ,शब्द समजले नाहीत ते शब्द captcha साठी उपयोगात आणले गेले. म्हणजेच कोणताही code (रोबोट) त्या शब्दांना ओळखणार नाही आणि captcha ही भरू शकणार नाही. याला re-captcha असेही म्हटले जाते .पण सतत captcha भरायला लागणं म्हणजे अनेकांना कंटाळा वाटायचा. ही बाब लक्षात घेता गूगलने २००९ मध्ये Re-captcha ला खरेदी केले .
⌧ I am not robot जेव्हा तुम्ही गूगल वरुन कोणताही फॉर्म भरता तेव्हा तेव्हा तुम्हाला हा option येतो. आपल्याला आता फक्त त्यावर एक ✔️ अशी टिक करायची असते.तुम्हाला आता असा प्रश्न पडेल की ,हे काम रोबोट देखील करू शकतो? तर नाही हे काम रोबोट नाही करू शकणार.कारण Google ते सुद्धा पाहत असतं. जेव्हा आपण ✔️ अशी टिक करतो तेव्हा Google ला सर्व काही information जात असते . आपला आयपी ऍड्रेस , आपलं लोकेशन ,आपण किती वेळा स्क्रोल करतोय,आपण किती वेळ ह्या वेसाइटवर आहोत ह्या सगळ्या गोष्टी GOOGLE ला जात असतात. त्या वरून GOOGLE ला एक अंदाज येतो,की एखादा माणूस फॉर्म भरतोय की कोणी coding (रोबोट)व्दारे फॉर्म भरतंय. त्यासाठी GOOGLE च्या SERVER साईट ला MACHINE LEARNING चा PROGRAM तयार केलेला असतो.त्यावरून जर GOOGLE ला शंका आली की हा रोबोट आहे, तर त्या पेज वर तुम्हाला काही images दाखवले जातात. त्यावर तुम्हाला car,road strips, bridge अश्या images वर क्लिक करायला सांगतात. ते verify केल्यावर तुमचा आयपी ऍड्रेस white list केला जातो. त्यानंतर तुम्ही जर कधी फॉर्म भरायला गेलात. तर तुम्हाला ✔️ अशी टिक करून फॉर्म भरला जातो. तेव्हा गुगल तुम्हाला कोणतेही images दाखवत नाही .त्यासाठी तुम्हाला कोणताही शब्द टाईप करावा लागत नाही. अशा प्रकारे captcha चा उपयोग केला जातो.
तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की comment करून सांगा. www.marathistatuswishes.com ह्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
तसेच तुम्हाला घरगुती उपायांविषयी माहिती हवी असल्यास gharagutiupay.blogspot.com ह्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

![]() |
| captcha |

2 Comments:
Thnx for giving this information.
Good information.
Post a Comment