राजमाता जिजाऊ
१६ व्या शतकात महाराष्ट्राच्या बुलढाण्यात १५९८ साली सिंधखेडच्या लखुजी आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जन्माला आल्या क्रांतीज्योती,शिवाजीमहाराजांच्या आईसाहेब ,राजमाता जिजाऊ म्हणजेच जिजाबाई .अवघ्या आठ वर्षाच्या असताना त्यांचा विवाह मराठा सरदार शहाजी भोसले यांच्याशी झाला .पुढे जाऊन जिजाऊंचे पिता लखुजीराव आणि पती शहाजीमहाराज यांच्यात वादविवाद झाले . त्यांच्यातल्या मतभेदाने जिजाऊंनी मात्र खंबीरपणे आपल्या पतीशी असलेले नाते निभावत त्या पतीच्या पाठीशी उभ्या राहिल्या . काळजावर दगड ठेवून त्यांना आपल्या माहेरशी असलेले नाते तोडावे लागले . नात्यांना बाजूला सारून कर्तव्याला त्यांनी धैर्याने मार्ग दाखवला.
जिजाऊंना आठ आपत्ये झाली त्यातली सहा मृत्यू पावली . त्यातही खचून न जाता, स्वतःला धीर देत त्या आपल्या पती समवेत राज्यकारभार चालवू लागल्या. १९ फेब्रुवारी १६३० साली सूर्यास्ताच्या वेळेस शिवनेरी येथे शिवाजी राजांचा जन्म झाला . थोरला मुलगा संभाजी हा शहाजी महाराजांजवळ तर शिवाजी राजे जिजाऊंसोबत .शिवाजी राजे सात वर्षाचे असताना त्यांना शिक्षण घेण्यास पाठवले ,शिक्षण पूर्णझाल्यानंतर शिवाजी राजे बारा वर्षाचे असताना काही कालवादिनेच शहाजी राज्यांनी शिवाजी राज्यांवर पुण्याची जहागिरी सोपवली अर्थातच ती जिजाऊंवर येऊन पडली .
काही अधिकाऱ्यांसमवेत शिवाजी राजे आणि जिजाऊ पुण्यात आले. त्यावेळेस पुण्याची परिस्तिथी अतिशय भिषण होती . निजामशाही ,आदिलशाही आणि मुघलांच्या रोजच्या दंगलीने तेथील जनता पार हादरून गेली होती . पुण्यातील रयत पुणे सोडून जाऊ लागली. खायला अन्न नव्हतं अश्या परीस्तीत रयतेला उभं करून राज्य स्थापन करायचं म्हणजे एक कठीण पेच होता . जिजाऊंनी जनतेला एकत्र जमवून आधार देत सांगितले,आपण मिळून सारं उभ करू. माझा शिवबा आहे तुमच्या रक्षणासाठी ,या परत आपल्या भूमीत आणि राज्य करा . अंधश्रद्धेचं असलेलं सावट दूर करून जिजाऊ शिवबांसोबत पुण्यात राहू लागल्या . रयतही त्यांना पाहून परत आली .
सगळं सुरळीत चालू होत अश्यात दऱ्याखोऱ्यातली जनावरं येऊन शेतीची नासधूस करत . रयत त्रस्तवली ,शेती करायची तरी कशी ?खायचं काय ?असे अनेक प्रश्न्न रयतेने मांडले . जिजाऊंनी पूर्ण विचार केला आणि दवंडी पिटवली ,जो कोणी जनावरांचा बंदोबस्त करील त्याला एक सोन्याचं कड देण्यात येईल . रयतेतली मर्दानी पोर पहारा देऊ लागली आणि एके मध्य रात्री सात-आठ पोरांच्या गटाने जनावर मारलं .ते जनावर घेऊन ती पोर जिजाऊंना दाखवायला गेली .पाहारेकऱ्याने त्या पोरांना विचारलं ,काय रं पोराणू इतक्या रातीला काय काम हाय?त्यावर पोरांनी उत्तर दिल ,आम्हाला माँ जिजाऊंना भेटाचंय . आम्ही जनावर आणलंया . अरं पोरांनो उद्याच्याला या माँ साहेब निजल्यात . आवाजाने जिजाऊ बाहेर आल्या ,काय झालं पोरांनो . माँसाहेब जनावर मारलंया . त्या पोराची पाठ थोपटत म्हणाल्या ,अरं पोरांनो उद्याच्याला आला असतात तरी सोन्याचं नाणं दिलंच असत की . त्यावर तो पोरगा म्हणाला ,माँसाहेब आम्ही सोन्याच्या कड्यासाठी नव्हतं आलो ,आम्हाला तुमच्या कौतुकाची थाप हवी होती म्हणून आलो व्ह्यतो . जिजाऊ नी त्या पोराला नाव विचारलं आणि तोच होता तो तान्हाजी मालुसरे . त्यादिसापासून तान्हाजी स्वराज्याचा झाला. अश्या अनेक सहकाऱ्यांना जोडून शिवबाला मोठी मानवी बळाची ताकद त्या मातेने दिली .
शिवाजी महाराज्यांचा पुढच्या शिक्षणाची जबाबदारी हि जिजाऊंवरच होती . रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी शिवाय इतर कथा त्या शिवबांना सांगत . काय चांगले आणि काय वाईट ,लढाया कश्या लढायच्या अश्या अनेक बारीकसारीक गोष्टींचे ज्ञान शिवबांना दिलं. प्रेम, राग ,सत्य ,असत्य काय असते हे सांगितले. यश भेटलं तरी त्याच्या अति आनंदात हुरळून न जाता पुढे अजून काय करता येईल ,अपयश आले तरी रडत न बसता यश कसे मिळवता येईल याचाअभ्यास त्यांनी शिवबांन कडून करून घेतला . राजनीती कशी खेळायची , राज्य कसे सांभाळायचे , योग्यवेळी योग्य निर्णय घेऊन जनतेचे प्रश्न कसे सोडवायचे हे सार ज्ञान राजे जिजाऊंसोबाबत राहूनच शिकले. अनेक कठीण प्रसंगात जिजाऊंनी शिवरायांना मार्गदर्शन केले. त्या स्वतः राज्यकारभारात बारकाईने लक्ष देत .अश्या महान मातेमुळेच स्वराज स्थापन झाले . जनतेला शिवाजी महाराजांसारखे राजे लाभले .
शिवाजी महाराज्यांच्या राज्याभिषेकाच्या अवघ्या बारा दिवसांनी १७ जून १६७४ साली राजमाता जिजाऊंनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी शेवटचा श्वास घेतला . अश्या वीरमातेचा आदर करत ,प्रत्येक स्त्रीने आपल्यात असे गुण रुजावले पाहिजेत .
जय हिंद !

0 Comments:
Post a Comment